Ticker

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य औषधी वाटप व रोगनिदान शिबिर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य औषधी वाटप व रोगनिदान शिबिर


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड येथे भव्य रोग निदान शिबीर व औषधी वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नंदकिशोर माहेश्वरी सर होते तसेच या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.पुजा सुमित्रा रमाकांत खेतान मॅडम आणि माजी सरपंच पंकज वानखडे साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नंतर केक कापण्यात आला आणि कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, यामध्ये ३०० पेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धर्मेंद्र शिरसाट व संमता व्यायाम शाळा शिंदखेड यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुमिरमा फाउंडेशन चे सदस्य संजय ठोके, विशाल धांडे, शिवानी राजुरकर,सोनू ठाकुर, आनंद गवई, प्रमोद जाधव, शेरू मिश्रा, विवेक गावंडे, सूरज हिवाळे, सुरेखा शिरसाट याचं योगदान होते या कार्यक्रमाचे संचालन आशिष खिल्लारे तसेच आभार प्रदर्शन धर्मेंद्र शिरसाट यांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या