Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय बालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय बालकाचा मृत्यू


अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाशिम बायपास येथील अहमद कॉलनीसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. शेख अल्फराज शेख जिगर असे मृत मुलाचे नाव उघड झाले आहे. या घटनेची माहिती जुने शहर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस ठाण्याचे एस एच ओ सेवानंद वानखडे घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. 
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचा मृतदेह बराच वेळ तेथेच पडून होता, ही बाब स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी जुने शहर पोलिस स्टेशनला दिली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आणि घटनास्थळावर गर्दी कमी करण्यासाठी जुने शहर पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अद्याप अज्ञात वाहनाचा शोध लागला नसून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे आणि शोककळा पसरली आहे. 


आमदार रणधीर सावरकर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह तातडीची बैठक


अकोला
ट्राफिक व्यवस्था व्यवस्थित करा दुर्घटना घडणार नाही याकडे लक्ष द्या अकोल्यातील वाशिम बायपास टॉवर चौक अशोक वाटिका चौक येथे कर्मचाऱ्यांची व्यवस्थित ड्युटी संदर्भात लक्ष केंद्रित करून भविष्यात असा प्रकार होणार नाही याकडे सूचना द्या असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राऊत मॅडम यांना यांच्या यांना करून ट्राफिक अधीक्षक रिंगणे यांना या संदर्भात सूचना द्या असे प्रत्यक्ष भेटून दिले.


 वाशिम बायपास इथेदुर्घटनाहून एक लहान बालकाचा निधन झाला या घटनेची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शोक वेदना संवेदना व्यक्त करूनअशोक वाटिका वाशिम नाका लक्झरी स्टॅन्ड वाशिम नाका महाराजा अग्रेशन चौक, बस स्टॅन्ड, नेहरू पार्क या भागाकडे लक्ष केंद्रित करण्याचे सूचना ट्राफिक विभागाला देण्यात यावा व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याने पालन करून ट्राफिक व्यवस्थित तसेच त्याची गती याकडे लक्ष द्यावे यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करण्यात आली व भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्याआमदार सावरकर सोबत माधव मानकर अक्षय जोशी दिलीप मिश्रा अमोल गोगे हेमंत शर्मा अमोल गीतेमंगेश सावरकरविजय ठाकूर अमोल मोहकार विजय चौधरीआधी वाशीम बायपास येथे आज एका दहा वर्षीय मुलाचा ट्रक च्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला या विषयाला घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची भेट घेऊन स्थानिक वाशीम बायपास चुकांच्या आजूबाजूला अवैदध्य रित्या सुरु असलेल्या गॅरेज वर कारवाई करून या संबंधित येत्या आठ दिवसात परिस्थिती सुधरवण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी वाहतूक इंजार्ज PI किनगे यांना सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले. विक्की भिसे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या