Ticker

6/recent/ticker-posts

नॅशनल जिनिंगला आग;लाखोंचे नुकसान..

नॅशनल जिनिंगला आग;लाखोंचे नुकसान..


मुर्तीजापुर एमआयडीसी परिसरातील नॅशनल जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मध्ये शनिवारी 15 एप्रिल रोजी 7 ते 7:00 वाजताच्या सुमारास आग लागली दरम्यान आग आटोक्यात येईपर्यंत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


आज 16 एप्रिल रोजी प्राप्त माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील नॅशनल जिनिंग फॅक्टरी असून सदर जिनिंग फॅक्टरी शिवानी ट्रेडर्स चे प्रोप्रायटर अजय किशोर अरोरा हे मागील सहा महिन्यापासून भाडेतत्त्वावर चालवीत होते. सदर जिनिंग फॅक्टरी मध्ये आग लागून या आगीत कापूस,रुई,सरकी अंदाजे 35 ते 40 लाखाचे व मशिनरींचे 5 ते 6 लाखाचे असे एकूण अंदाजे 45 ते 50 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आग लागल्यानंतर तातडीने मुर्तीजापुर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठे परिश्रम घेतले.मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद देण्यात आल्याची माहिती अजय अरोरा यांनी दिली. आणि लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या