अकोट तालुक्यातील लोतखेड येथे गोळीबार!
माजी सैनिकाचा गोळीबार, एक जण जागीच ठार
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येत असलेल्या लोतखेड गावात आपसी जुन्या वादातुन गोळीबार झाल्याची घटना झाली आहे. या गोळीबारात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष फिरोज पठाण वय 48 वर्ष असून जागीच ठार झाले आहेत. गोळीबार करणारा हा कदीर शाह असुन माजी सैनिक असल्याची माहिती आहे. जमिनीच्या वादातुन घडलेल्या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहिहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अंमलदारांसीह घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार झालेल्या व्यक्तीला अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या