Ticker

6/recent/ticker-posts

देशाच्या प्रगतीत महिलांचा सिहांचा वाटा, आमदार रणधीर सावरकर यांचे प्रतिपादन

देशाच्या प्रगतीत महिलांचा सिहांचा वाटा, आमदार रणधीर सावरकर यांचे प्रतिपादन


चोहोटा बाजार येथे कर्तुत्व्वान महिलांचा भाजपच्या वतीने सन्मान


चुल आणी मूल या मर्यादित चौकटीतुन बाहेर पडत आज प्रत्येक क्षेत्रात महिला वर्ग स्वतःच्या मेहनतीने आपलं वर्चस्व सिद्ध करत आहेत. त्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनिय असून त्यांच्या कर्तृत्वाचा देशाच्या प्रगतीत सुद्धा सिहाचा वाटा असल्याचे मत अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी चोहोटा बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 


भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अकोट ग्रामीणच्या वतीने सोमवारी चोहोटा बाजार येथील ग्रामपंचायत कार्यलयात आयोजित सत्कार सोहळ्यात आरोग्य , शिक्षण , सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या मातृशक्तीचा आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते सुषमा स्वराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शॉल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला राजु भाऊ नागमते विजयसिंह सोळंके संतोष भाऊ शिवरकर गजानन भाऊ नळे , विवेक भरणे , देविदासजी म्हैसने मधुकर पाटकर सुभाष भाऊ मुकुंदे दत्ता गावंडे सौ रुपाली ताई काकडे सिंधुताई गडम उज्वलाताई डोबाळे किशोर भाऊ सरोदे समाधान येरोकार ज्ञानेश्वर आढे सतिष सावरकर पवन वर्मा धनंजय बुंदे ज्ञानेश्वर महल्ले सुनिल फोकमारे निलेश वहीले गणेश पाकदुने गोपाल पेटे विनोद साबळे ओंकार बेंडे नितिन गोंडचवर पुरुषोत्तम धुमाळे शेषराव मोडक सुधिर साबळे राजेश मोडक रंजीत बुले सह भाजचे पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या