जडीबुटी औषध दुकानात वनविभागाचा छापा, चार जन अठकेत
प्रसिध्द जडीबुटी व्यावसायिक अमरसिंह ठाकूर यांच्या दोन दुकानांवर बुधवारी अकोला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकल्याने शहरात खळबळ उडाली. या कारवाईत वन्य प्राण्यांचे अवशेष, प्रतिबंधीत जडीबुटी आणि समुद्री जीवांचे अवशेष जप्त करण्यात आले असून मालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
अकोला शहरातील मोहम्मद अली रोड वर ठाकूर अमरसिंह नावाचं जडीबुटीचे औषधालय आहे. या ठिकाणी आज अकोला वन विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात हरणाच्या शिंगाचे तुकडे, घोरपडच्या मासाचे तुकडे, हत्ती दाताची पावडर, सायाळचे काटे, सोबतच समुद्रामध्ये आढळणाऱ्या कोरल जीवांचे अवशेष, लाल चंदन, पांढरे चंदन वन विभागाने जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेड्युल वन मध्ये येत असलेल्या वन्य प्राण्यांच्या अवशेषांना जप्त केले आहे. या प्रकरणात चौघांना ताब्यात घेतले असून ठाकून अमरसिंग यांचे दुकान सील करण्यात आले आहे. यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक के. आर अर्जुना यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनपाल गजानन इंगळे, वनपाल सुनील राऊत, वनरक्षक प्रियंका इंगळे, वनरक्षक फिरते पथकाचे मोरे, तायडे, बागबाण, स्वप्नील राऊत, अनिरुद्ध चौधरी आदी वन कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून पुढील कारवाई अकोला वनविभाग पथक करत आहेत.
0 टिप्पण्या