रामदास पेठ पोलिसांची प्रशंसनीय कामगीरी, घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड, आरोपी केले अटक!
पोलीस स्टेशन रामदास पेठ जि. अकोला येथे दिनांक २७ ऐप्रील २०२३ रोजी सुबोध महादेव समुदरे वय ४० वर्षे व्यवसाय रेल्वे लिपीक यांनी तक्रार दिली होती. नातेवाईकांचे लग्न असल्याने सर्व कुटुंब दिनांक २२ ऐप्रील २०२३ रोजी सकाळी लग्ना करीता शासकीय निवासस्थानाला कुलुप लावुन बाहेरगावी गेले होते. दिनांक २४ ऐप्रील २०२३ रोजी घरी परत आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला व घरातील सोनी कंपनीचा टि.व्ही., सिलाई मशिन, लहान मुलांची सायकल व नगदी २ हजार रू असा एकूण ४६ हजार रु चा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याची तक्रार दिल्याने पो स्टे रामदास पेठ येथे अज्ञात आरोपी विरुध्द अप क्रमांक १६३ / २०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा उघडकीस आणन्याकरीता पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस स्टेशन रामदास पेठ यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या व १२ तासाचे आत तपास पथकाने गुन्हयाचा छळा लावुन गुन्हयातील आरोपी मोसीन शेख फारूक वय २८ वर्षे रा. तारफैल सिध्दार्थ नगर अकोला ह.मु. शंकर नगर अकोला यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्याने नमुद आरोपीला सदर गुन्हयात अटक करून त्याचे जवळून गुन्हयात चोरी गेलेला ४६ हजार रू मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राउत मॅडम, सहा. पोलीस अधीक्षक गोकुळ राज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस स्टेशन रामदास पेठ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार विजय सावदेकर, तोहीद अली काझी, शिवम दुबे, स्वप्नील चौधरी यांनी केली.
0 टिप्पण्या