भाजपामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचा सन्मान
अकोला
पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कर्तुत्वाचा लाभ समाजसेवा सोबत पक्ष विस्तारासाठी निश्चित करत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात अनेक युवाशक्ती प्रवेश करत आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या विकासाची काम व पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विश्वास असल्याची प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
जनता पक्षात आज शिवसेना सर्कल प्रमुख नितीन मोरे तसेच भारिप सतीश पवार यांनी जाहीर आपल्या समर्थकांसह प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमदार वसंत खंडेलवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे तेजराव थोरात अनुप धोत्रे किशोर पाटील अर्चना मसने माधव मानकर गणेश अंधारे संतोष पांडे एडवोकेट देवाशिष काकड चंदाताई शर्मा जयंत मसने रश्मी कायंदे गीतांजली शेगोकार सुमन ताई गावंडे राजेंद्र गिरी अंबादास उमाळे रमेश आप्पा खोबरे संजय जीरापुरे संजय गोडा , निलेश निनोरे, यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
आमदार रणधीर भाऊ सावरकर विजय अग्रवाल यांनी नितीन मोरे व सचिन पवार यांचा भाजपाचा दुपट्टा घालून स्वागत केलं व त्यांच्या समर्थकांचा भाजप पदाधिकारी यांनी स्वागत केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या