Ticker

6/recent/ticker-posts

भयंकर! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांना व्हाट्सअप द्वारे धमकी

भयंकर! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांना व्हाट्सअप द्वारे धमकी

अकोला:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सिवील लाईन पोलीस स्टेशन येथे 1 एप्रिल 2023 रोजी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान एक तक्रार दाखल केली. यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी नमूद केले आहे की, 1 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी अनोळखी इसमाने संदेश पाठविला. यामध्ये धमकीदायक वक्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्यावर वक्तव्य करताना जरा सांभाळून करा; नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार अशा प्रकारचे विधान व्हाट्सअप संदेश द्वारे दिला आहे. यामधून सरळ अर्थ जिवे मारण्याची धमकी किंवा असा इशाराचा संदेश प्राप्त झाला असून, याद्वारे आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अज्ञात इसमावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी विनंती राज्यातील सध्या परिस्थिती पाहता हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे व योग्य तपास व्हावा यासाठी ठोस पावले उचलावीत अशी ही विनंती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.


नेमकं आमदार अमोल मिटकरी यांनी काय वक्तव्य केले?

 दोन दिवसापूर्वीच राम नवमी चा कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी रामनवमी जल्लोसा साजरे करण्याचे आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. याच प्रतिक्रियेवर आमदार मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटद्वारे सांगितले की, "रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित हिंदू जननायक परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात हंस चुगेगा दाना तीनका| कौवा मोती खायेगा ||" अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर आमदार मिटकरी यांना संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी व्हाट्सअप द्वारे धमकीदायक संदेश दिल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आता हे प्रकरण कुठे वळण घेते आणि पोलीस काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या