16 वर्षीय मुलगा बेपत्ता ,खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
अकोला शहरातील
खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर येथील एक १६ वर्षिय मुलगा मावशी च्या घरी जातो म्हणून दि ६ एप्रिल रोजी घरु निघून गेला, परंतु तो तेथे पोहोचला नाही, या घटनेची माहिती नातेवाईकांनी खदान पोलिस ठाण्यात दिनांक ९ एप्रिल रोजी लेखी माहिती दिली वरुन पोलिसांनी पोलिस दप्तरी नोंद घेऊन शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर क्रांती चौक येथील आदित्य ज्ञानेश्वर सरकटे वय १६ वर्ष या शालेय विद्यार्थ्यांने या वर्षी इयत्ता दहावी ची परीक्षा दिली, दरम्यान परिक्षा संपली त्यामुळे तो दिनांक ६ एप्रिल रोजी मावशी च्या घरी जातो म्हणून घरुन निघून गेला परंतु तो दिनांक ९ एप्रिल पर्यंत मावशी च्या घरी पोहचला नाही, आदित्य ची आई वडील व नातेवाईकांनी शोधा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही, अखेर नातेवाईकांनी या घटनेची माहिती खदान पोलिस ठाण्यात दिली वरुन पोलिसांनी पोलिस दप्तरी नोंद घेऊन शोध घेत आहेत,जर फोटोतील मुलगा
ज्या कुणाला आढळून आला तर खदान पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या