Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे योजना फसवी - गजानन तायडे, वंचीत

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे योजना फसवी - गजानन तायडे, वंचीत

अकोला:
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे योजने विरोधात बहिष्कार व निषेध वंचित बहुजन आघाडीचे प्रचारक गजानन तायडे व त्यांच्या सहकार्यानी अकोला जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करून केला आहे. साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजासाठी लॉटरी काढून थेट एक लाख रुपये देणारी ही योजना फसवी असून अन्यायकारक आहे. काढलेल्या परिपत्रकामध्ये खेळाडूला दिलेल्या आरक्षणामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दिव्यांगाचा लाभाच्या यादीमध्ये समावेश करणे, लाभार्थी उद्दीष्ट वाढवून ३०० लाभार्थ्याची निवड करणे. कर्जासाठी घेण्यात येणारा शासकीय जामीनदार ही अट व सातबारा वरील बोजा चढविण्याची अट रद्द करावी. विधवा, परितक्ता महिलांचा लाभाच्या यादीमध्ये समावेश करावा.

  सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆स्पर्श करा: बाईट- गजानन तायडे, वंचीत
 अनेक वर्षापासून महामंडळाच्या विशेष व थेट योजना बंद पडल्या होत्या त्यामुळे शासन व महामंडाळाच्या प्रती समाजाच्या संतप्त भावना व्यक्त होत असतांना. महामंडळाने एक लाख रुपये थेट कर्ज योजना अमलात आणली आहे. परंतु या योजनेमध्ये काढलेले परिपत्रकामध्ये जाचक अटीसह शासकीय जामीनदार घेण्यात येत आहे. तसेच अनेक नियमांची विसंगती आहे. जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात मातंग समाजाचे बेरोजगार युवक असतांना नाममात्र ३० लाभार्थ्यांना लाभ देऊन इतर मातंग बांधवावर अन्याय होत आहे. म्हणून महामंडळाने किमान जिल्हास्तरावर ३०० लाभाथ्र्यांची निवड करणे अपेक्षीत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व विधवा महिला अशा लाभाथ्र्यांचा शासन निर्णयामधे मध्ये समावेश असावा. यामुळे मातंग समाजाची दिशाभूल करणारा हा शासन निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला. वरील मागण्याची शासनाने गांभीर्यपूर्वक विचार न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग समाजाच्या व लाभार्थ्यांच्या वतीने निवेदनातून निषेध करण्यात आला आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या