Ticker

6/recent/ticker-posts

महापालिका शाळा क्र. ७ जागतिक महिलादिन

महापालिका शाळा क्र. ७ जागतिक महिलादिन


पिढी संस्कारित करण्याचे बहुमोल कार्य करणाऱ्या महापालिका शाळा क्र. ७ मधील शिक्षिकांनी केला जागतिक महिलादिन. दिनांक ८ मार्च २०२३ जागतिक महिला दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री इटकर सर यांनी केले. अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षिका सौ. अपर्णा ढोरे मॅडम, प्रमुख अतिथी विषय तज्ञ श्री मनोज बोचरे सर, तर विशेष अतिथी म्हणुन श्री राजु पांढरे सर, सौ. नेहा सोनोने (गटप्रमुख) हे लाभले होते. सर्व माता पालकांचा व शिक्षिकांचा श्री इटकर सर (मुख्याध्यापक) यांनी सत्कार केला. सर्वाना महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महिला सक्षमीकरण मुलीना असलेल्या सोयी सवलती यावर हि अधिक प्रकाश सरांनी टाकला काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. माता पालकांना विशेष मार्गदर्शन केले. ते आदर्श शिक्षिका कु नयना गोटे मॅडम यांनी श्री बोचरे सर यांनी ही स्त्रिया विविध क्षेत्रात कशी प्रगती करत आहेत. ते आपल्या शब्दातून व्यक्त केले. श्री. पांढरे सरांनी पॉलीसी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आज वाढदिवस असणाऱ्या कु. वैष्णवी सहा हिची फ्री पॉलीसी काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.


सुंदरशा कवितेने अध्यक्षीय भाषण झाले व नंतर वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी सौ. मंदा खिरोडकर मॅडम, सौ. जयश्री वानखडे मॅडम, कु. सुलभा सदाफळे मॅडम, कु. सविता पांडे मॅडम, सानोली सतपाल मॅडम, सुजाता इंगळे मॅडम, रुपाली तायडे, यांचे सहकार्य लाभले विजय मानवटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.


कार्यक्रमाचे सुत्रा संचालन सौ अनिता नवलकार मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन कु. नयना गोटे मॅडम यांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या