कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह सापडला
धाडी शेतशिवारातील घटना, आकस्मिक मृत्यूची नोंद
नासीर शेख
पातूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत धाडी शेतशिवारात एका नाल्या जवळ पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवार दि.१० मार्च रोजीच्या दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे.धाडी परिसरात नाल्या जवळ कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील पारवे यांनी चान्नी पोलिसांना दिली ,सादर माहितीवरून ठाणेदार योगेश वाघमारे उपनिरीक्षक गणेश महाजन, भगवान शिंदे, सुधाकर करवते, सुनील भाकरे,दत्ता हिंगणे, योगेश डाबेराव, देशमुख, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले असून, मृतदेहाची अद्यापही ओळख पटली नाही, चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन करीत आहे.
घातपात किंवा आत्महत्या : ग्रामस्थ मध्ये संभ्रम
सापडलेला पुरुषाचा मृतदेह १० ते १२ दिवसापूर्वीचा असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे.धाडी परिसरातील बेपत्ता किंवा आत्महत्या, हत्या झाल्याची घटना या दोन आठवड्यात घडली नाही, त्यामुळे मृत व्यक्ती इतर परिसरातील असल्याचा अंदाज आहे.त्यामुळे घातपात किंवा आत्महत्या असल्याची शक्यता असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रतिक्रिया
धाडी परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, ओळख पटली नसून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर तथते काय आहे. हे समोर येईल
योगेश वाघमारे ठाणेदार पोलीस स्टेशन चान्नी
0 टिप्पण्या