विधीमंडळात हरभरा खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी- आ.रणधीर सावरकर
हरभरा खरेदी बाबत काल औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता आज पुन्हा या विषयाला घेऊन खरेदी केंद्र वाढवण्याची व खरेदी आणि नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरळीत सुरु करण्याची मागणी आ.रणधीर सावरकर यांनी शासना कडे केली
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ढिसाळ कारभार व अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांचा मनमानी कारभार, अलिकडेच अल्पवयीन मुलीचा तोतत्या डॉक्टरांकडून झालेला विनयभंग तसेच रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना होणारा त्रास या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व संबंधित दोषींवर कारवाईची मागणीचा मुद्दा उपस्थित केला. अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि हिंगोली या जिल्ह्यातील रुग्ण अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचारात उपचारासाठी येत असतात. आरोग्य सुविधांअभावी विद्यार्थी रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. अधिष्ठातांचा मनमानी कारभाराचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या काही महिन्यांपासून बंद केली आहे.
आमदार रणधिर सावरकर यांनी विधीमंडळ अधिवेशनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराबाबत मुद्दा पुढे केल्याचेही दिसले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या