गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता,पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून कौतुक
प्रतिनिधी संतोष माने:
मुर्तीजापुर:३मार्च:मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांची गोवंश तस्करांविरुद्ध दबंग कारवाई पहा..बोलेरो पिकअप वाहनांमधून कत्तलींच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्यां अकरा गोवंश जनावरांची ग्रामीण पोलिसांनी मुक्तता केली आहे. शुक्रवार (ता.3) रोजी सकाळी 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास तालुक्यातील ग्राम पारद फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, बोलेरो पिकप वाहनांमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना समजली.
त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी पिकअप (क्र.एमएच.३०, बी डी १०७७) हे वाहने पकडले. या वाहनांतून हजारो रुपयांची ६ गाई ५ गोरे अशी लहान-मोठी गोवंश जनावरे ताब्यात घेतली.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रंजीत खेडकर यांच्या नेतृत्वात गजानन संय्याम,पी सी सुदाम याच्या टीमने लाखपुरी ते म्हैसांग मार्गावर मार्गाचा अवलंब गैर कामासाठी होत असल्याचे समजल्यावर गेल्या एक महिन्यापासून या मार्गावर रात्रीचे पेट्रोल सुरू होते.अखेर आज तीन मार्च रोजी ग्रामीण पोलीसांनी सापळा रचून दबंग कारवाई करीत हजारो रुपयांचे अकरा गोवंश जनावरे आणि बोलोरो पिकअप असा अंदाजे लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळेचं एवढी मोठी कारवाई झाली पण यामधील 2 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणारचं.चला जाऊ द्या की कारवाईत झाली ना...अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.
या कारवाईबद्दल पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे. यापुढेही कारवाईत असेच सातत्य ठेवावे, असा सूरही नागरिकांतून उमटत आहे.



0 टिप्पण्या