Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भस्तरीय स्त्री -रत्न पुरस्कार - २३ साठी जयश्री पाटील यांची निवड

विदर्भस्तरीय स्त्री -रत्न पुरस्कार - २३ साठी जयश्री पाटील यांची निवड 


मातोश्री स्व. वेणूताई बिडकर फाऊंडेशन कुंभारी, अकोला यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यावर्षीच्या अत्यंत प्रतिष्टेच्या 'विदर्भ स्तरीय स्त्री रत्ना पुरस्कार -२०२३ करीता जयश्री पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 
जयश्री पाटील अकोला जिल्याच्या प्रथम डिस्ट्रिक्ट आयकॉन, सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी, VJ, समुपदेशिका, निवेदिका, उत्कृष्ट मुलाखतकार आणि भारतीय संस्कृती विकास संस्था यांच्या सदस्य आहेत. 
सांस्कृतिक, सामाजिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, महिला सक्षमीकरण, मतदार जागृतता, कोरोनाबाबत दक्षता, प्लास्टिक बंदी आणि युवकांसाठी करिअर गायडन्स असे विविध उपक्रम, कार्यशाळा, मान्यवरांच्या मुलाखती, ऑडिओ - विडिओ द्वारे जनजागृती कार्य केले आहे. त्यासोबतच अनेक लघु चित्रफीत तयार करण्यात आल्या आहेत, लहान मुलांना अभिनयाबाबत मार्गदर्शन केले आहे. बालनाट्य शिबीर घेण्यात आले आहेत, त्यासोबतच स्टेज डेरिंग, व्हॉईस टोन, सवांद, डायलॉग इ. बाबत मार्गदर्शन केलेले आहे. 



जयश्री पाटील या उत्कृष्ट मुलाखतकार असून त्यांनी विविध सेलेब्रिटीज, डॉक्टर्स, राजकीय नेते इत्यादींच्या १०० पेक्षा अधिक मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्याबद्दल Aspiring Women अवॉर्ड, रयतेचे स्वराज्य प्रतिष्टान, संत गाडगे बाबा संस्था इ संस्था मार्फत सन्मान करण्यात आला आहे. मतदार जन जागृती बाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याकरीता ज़िल्हाधिकारी यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करण्यासाठी सन्मानपूर्वक दिल्या जाणारा हा पुरस्कार मा. माजी आमदार प्रा .तुकाराम बिडकर यांच्या वाढदिवसानिम्मित कार्यक्रमात जयश्री पाटील यांना ५ मार्च २०२३ रोजी प्रमिलाताई ओक सभागृह मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते आणि माजी आमदार गजाननराव दाळु गुरुजी, जेष्ठ अभिनेते तुकाराम बिडकर तसेच दृश्यम फेम अभिनेते कमलेश सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभात स्मृतिचिन्ह, मानपत्र , शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देऊन प्रदान करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या