Ticker

6/recent/ticker-posts

महिला दिनानिमित्त "सुषमा स्वराज" पुरस्कार प्रदान

महिला दिनानिमित्त "सुषमा स्वराज" पुरस्कार प्रदान



भाजपा महानगर महिला आघाडी चा उपक्रम समाजातील विविध क्षेत्रातील मातृ शक्तींचा गुणगौरव


  अकोला
समाज व राष्ट्र परिवार निर्माण त व प्रगतीमध्ये मातृशक्तीचे महत्त्वपूर्ण स्थान असून सनातन धर्म मध्ये मातृशक्तीला महत्त्वाचे स्थान दिला आहे त्यामुळे सिताराम राधेश्याम गौरीशंकर यान हे नाव ठेवण्यात येत होते तसेच सरस्वती शारदा लक्ष्मी यांची पूजा तसेच मा जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर , अहिल्याबाई होळकर राणी झाशी, राजमाता सारख्या मातृशक्ती यांनी तसेच समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये समाज राष्ट्र संस्कृती संवर्धनाचे काम मातृशक्तीने केल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊ न राजकारण समाजकारण क्षेत्रामध्ये कार्यरत व असे आव्हान सो मंजुषाताई सावरकर यांनी केले.


प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या  
सुहासिनीताई धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल श्री विजय अग्रवाल यांच्या यांच्या मार्गदर्शनात भाजपा प्रदेश केंद्र,
जाहीर करण्यात आलेल्या स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड योजनेअंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडी दक्षिण मंडळात कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.अकोला प्रदेश समन्वयक सौ.संगीताताई शिंदे, सौ मंजुषाताई सावरकर,महापौर सौ अर्चनाताई मसने, महानगराध्यक्ष सौ. चंदाताई शर्मा, सौ अर्चनाभाभी शर्मा, सुनीता भाभी अग्रवाल,सौ.योगिताताई पावसाळे, सौ.मनीषाताई भन्साली,सुषमा स्वराज अवॉर्ड समन्वयक सौ.रश्मीताई कायंदे,मंडळ अध्यक्ष सौ साधनाताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला दिन गौरव सोहळा *राधाकृष्ण पार्क*, *बालाजी नगर, गोरक्षण रोड अकोला* येथे आयोजित करण्यात आला होता. 


सो मंजुषा ताई सावरकर यांच्या हस्ते काजल राजवैद्य,डॉ.आरती गोडबोले,प्रांजली जयस्वाल,श्रुती भांडे,जयमाला खेडकर,वर्षा उके,अनिता मारवाल,उषा बाहेती,माधुरी दाते या कर्तृत्ववान महिलांना स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या गुणगौरव महिला दिन सोहळ्यास सर्व नगरसेविका, पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष,मंडळ कार्यकारणी तसेच सर्व महिला आघाडी बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचलन रश्मी कायंदे तर प्रास्ताविक मनीषा भसाली तर आभार प्रदर्शन चंदा शर्मा यांनी केले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या