राम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीचे वतीने शहरात निघाली मोटरसायकल रॅली
आमदारांच्या व राजकीय नेत्यांच्या उपस्थिती मध्ये झाला समारोप
अकोला रामनवमीचे औचित्य साधून श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीचे वतीने प्रत्येक पुरुषात प्रभू रामचंद्र सारखे चरित्र असावे या भावनेचा संदेश देत अकोला शहरात सकाळी मोटर सायकल रॅली काढण्यात आली ही रॅली श्री राजराजेश्वर मंदिर येथून प्रारंभ करण्यात आली सकाळी आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर येथून मोटरसायकल रॅली आरंभ करण्यात आली ही रॅली खोलेश्वर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय रोड ,अशोक वाटिका या मार्गे नवीन बस स्टॅन्ड मार्गाने जगदंबा माता मंदिर गांधी चौक अशा शहरातील विविध भागात करण्यात आली
सदर रॅलीची समारोप सिटी पोलीस स्टेशन समोरील मोठे राममंदिर येथे आमदार गोवर्धन शर्मा, आम नितीन देशमुख,आम वसंत खंडेलवाल, बबनराव चौधरी शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर,डॉ अभय पाटील ,महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे आदींच्या उपस्थितीत पूजा करून रॅली चा समारोप करण्यात आला यावेळी , माजी नगरसेवक तथा शिवसेनाचे राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, नगरसेवक योगेश गीते यांच्यासह हजारो राम भक्तांसह मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी सर्व भाविक उपस्थित होते.





0 टिप्पण्या