Ticker

6/recent/ticker-posts

साना संजय खडसे ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत प्रथम

साना संजय खडसे ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत प्रथम 



अकोला उपजिल्हाधिकारी यांच्या मुलीने रोवला मानाचा तुरा


पुणे येथे क्रिएटिव्ह ग्रुप, औरंगाबादच्या वतीने आयोजित ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा सीजन ३ ग्रुप 'सी'मध्ये प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी साना संजय खडसे हिने प्रथम क्रमांकासह विजेता ठरली आहे. नवीन वर्षांत जानेवारी महिन्यात क्रिएटिव्ह ग्रुप औरंगाबादद्वारे जिल्हास्तरावर ऑडिशन घेण्यात आले होते. अकोला येथे झालेल्या ऑडिशनमध्ये सानाची १० ते १४ वर्ष वयोगटात महाराष्ट्र स्तरावर निवड झाली. ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांमध्ये साना अव्वल ठरली असून तिने सादरीकरण, कौशल्य व जनरल नॉलेजच्या जोरावर स्पर्धेत विजय संपादन केला आहे. या स्पर्धेत घेण्यात आलेल्या पारंपरिक ड्रेसमध्ये परिचय, कौशल्य सादरीकरण, रॅम्प वॉक, जनरल नॉलेज, एक्सटेम्पोर आणि ज्युरी राऊंडमध्ये साना खडसे हिने उत्कृष्ट सादरीकरण केले आणि सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या २०१७ च्या मिसेस युनिव्हर्सल पल्लवी कौशिक व क्रिएटिव्ह ग्रुप, औरंगाबादचे संचालक रवी जयस्वाल यांच्या हस्ते सानाला ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्यवती विजेता मुकुट तथा सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. अकोला जिल्ह्य़ातील उपजिल्हाधिकारी आणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आपले वडील यांच्यामुळे आम्हालादेखील सामाजिक दृष्टी मिळत आपले आदर्श असल्याचे साना म्हणाली. प्रशासकीय अधिकारी बनून समाजसेवा करण्याचे ध्येय असल्याचे सानाने स्पर्धेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या स्पर्धेला ज्युरी म्हणून पल्लवी कौशिक मिसेस युनिव्हर्सल २०१७, जस्मिन मिसेस क्वीन वर्ल्ड मंजूषा मुळीक, इंडियन क्वीन ऑफ क्वीन २०१९ मिस रुपाली, राजेश चंचलानी, गौरव सिपाणी यांनी काम पाहिले.


लहानपणापासून घेतलेले शिक्षण, ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर, प्रश्नांची उत्तरे दिली आणि मराठमोळे ड्रेस परिधान करून उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे सानाने सांगितले. साना हिला तिचे वडील निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, आई नीता खडसे, भाऊ संनीत खडसे,  तसेच आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे ती म्हणाली. या यशाबद्दल सानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या