Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात 31 मार्च रोजी राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव

अकोल्यात 31 मार्च रोजी राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव


 धम्म दीक्षा क्रांतीचे शिलेदार एड राजेंद्र पाल गौतम, पू भिक्षू ज्ञानज्योती यांची प्रमुख उपस्थिती
         

                                
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान चे आयोजन



अकोला --भारतातील सुवर्ण युगाचे निर्माते,लोककल्याणकारी धोरण राबविणारे महान शासक सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त या वर्षी 31मार्च 2023 ला धम्म दीक्षा क्रांतीचे शिलेदार एड राजेंद्रपाल गौतम, व पू भिक्षू ज्ञानज्योती यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सम्राट अशोक पर्व महोत्सव आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे उत्साहात साजरा करण्यात येत आहे, 



या सोहळ्यासाठी दिल्ली येथील धम्म क्रांतीचे शिलेदार, दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम,महाथेरो ज्ञानज्योती मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत. अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय अशोकपर्व महोत्सव होत आहे अशी माहिती
 चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोलाचे अध्यक्ष प्रा विजय आठवले यांनी आज पत्र परिषदेत दिली.     

भारतात शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्रांती घडवून भगवान बुद्धांचे समतेचे विचार जगभर प्रसारित करण्यात सम्राट अशोक यांचे ऐतिहासिक योगदान असून त्यांची प्रतीक,चार सिंहांची शिल्प कृती_अशोक स्तंभ ,अशोक चक्र राष्ट्रीय प्रतीक म्हणून भारताने स्वीकारली आहेत _त्यांच्या लोककल्याणकारी धोरणाचा_ भारतीय संविधानावर सुद्धा प्रभाव आहे तरी सुद्धा, शासन, प्रशासन, भारतीय  समाज व्यवस्थेत , सम्राट अशोक उपेक्षित आहेत
,त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत असावा , त्यांची जयंती राष्ट्रीय पर्व म्हणून भारत भर उत्साहात साजरी व्हावी या हेतूने चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोला चे वतीने*_अशोक *_पर्व* *महोत्सव *होत आहे 31 मार्च रोजी सकाळी भिक्षू संघाच्या वतीने धम्म ध्वजारोहण, व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल तर सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध उद्योजक समाजसेवी सुगत वाघमारे यांच्या शुभहस्ते अशोक पर्व महोत्सव चे उद घाटन करण्यात येईल ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर एम आर इंगळे हे राहतील तर स्वागताध्यक्ष प्रा डॉ संदीप भोवते असतील तर प्रमुख अतिथी म्हणून धम्म दीक्षा क्रांतीचे शिलेदार माजी सामाजिक न्याय, मंत्री आमदार अड राजेंद्र पाल गौतम,पू भिक्षू ज्ञानज्योती, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे,समाजसेवक डॉ संतोष हुशे,निवासी उपजिल्हाधिकारी प्रा डॉ संजय खडसे,समाजसेवक सम्राट डोंगर दिवे, सिनेट सदस्य डॉ संतोष बनसोड आंबेडकरी विचारवंत, डॉ विलास तायडे, सिने ट सदस्य डॉ रवींद्र मुंद्रे,समाज कल्याण अधिक्षक खुरेद्र तिडके प्रा डॉ वसंत डोंगरे प्रा डॉ बी. एच. किर्दक मोहन बेलसरे,प्रदीप चोरे दी.शा.गवई,संतोष भालदार अड संतोष कोल्हे ,महेंद्र गवई नंद किशोर सरदार इत्यादी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असेल दुपारी एक वाजता धम्म क्रांती,आंबेडकरी चळवळ,आणि बदलत्या परिस्थितीतील आव्हाने या विषयावर एड राजेंद्र पाल गौतम आपले विचार मांडणार आहेत,तर दुपारच्या सत्रात दुपारी तीन वाजता भिक्षू ज्ञानज्योती यांचे सम्राट अशोक कालीन स्वर्णिम भारत या विषयावर व्याख्यान होणार आहे, याप्रसंगी भंते धम्मपालजी, भंते सत्यानंदजी , भंते शाक्यपुत्र राहुल , भंते सुमितबोधी ,भंते चंद्रमणी, भंते नागसेन , भंते धम्मचेती ,भंते अमरज्योती व भिक्षू संघाची प्रमुख उपस्थिती असेल,  
तिसऱ्या सत्रात सामाजिक धार्मिक ,शैक्षणिक पत्रकरिता,साहित्य , इत्यादी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते प्रियदर्शी अशोक रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे पुरस्कार व सत्कार समारंभ प्रसंगी डॉ संतोष हुशे ,ठाणेदार सेवानंद वानखडे प्रदीप चोरे डॉ संतोष पेठे प्रा डॉ मंगला बोराडे,प्रा डॉ देवलाल आठवले ,दगडु वाहुर वाघ ,ऍड देवानंद गवई डॉ संतोष तायडे,रोहित जगताप, आकाश पवार,ऍड संतोष बोरे इत्यादीची उपस्थिती असेल प्रबोधन कार्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील बौद्ध विहारे,तसेच महिला उपासीका संघ ,उपासक संघ यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल , महामाया उपसीका संघ व बुद्ध शासन तरुण संघ यांचे लेझीम पथक आणि आखाडा कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिके सदर करतील आंबेडकरी चळवळीतील ,पुरोगामी चळवळीतील , सर्व संस्था संघटना ,व्यक्ती, उपसिका संघ यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अशोक पर्व महोत्सव यशस्वी करावा  
असे आवाहन चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान चे वतीने करण्यात आले. विशेष सत्कार..  
  सातत्याने समाजाविषयी सडेतोड भूमिका मांडणारे राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज. आणि अकोल्यातील वैचारिक क्रांतीला प्रभावी वक्ते,चोखंदळ श्रोते विचार मालिकेतून बळ प्रदान करणारे किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.... 
       

                         
   प्रियदर्शी अशोक समाजरत्न पुरस्काराचे मानकरी..  
 1 भोन जिल्हा बुलडाणा येथील सातवाहन कालीन बौध्द स्तूप विशेष लिखाण. केल्याबद्धल दै लोकमत उपसंपादक राजेश शेगोकार, 
.2 अंधश्रद्धा निर्मुलन व समाज जागृती. करण्यासाठी लेखणी झिजवणारे दै मातृभूमी संपादक पुरुषोत्तम आवारे, 
..4. लंपी साथ रोगासाठी ,तसेच सामाजिक कार्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पशु संवर्धन उपयुक्त अकोला डॉ जगदीश बक्तुरे 
5. स्त्री रोग तज्ञ..उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ सीमा तायडे 
 6....मोहन बेलसरे..
7 सत्यशोधक परिषदेच्या माध्यमातून कार्य करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ विलास तायडे,
 8. साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणारे भीमराव परघरमोर,
 9.सामाजिक कार्य. करणारे ऍड देवानंद गवई, .10.दी.शा.गवई,
11...सुनील थोरात .12.प्रभावी वक्ते डॉ संतोष बनसोड,
..13 डॉ रवींद्र मुंद्रे सिनेट सदस्य , 
14..डॉ वसंत डोंगरे प्रसिद्ध लेखक विचारवंत 15...डॉ अरविंद चव्हाण..समाज सेवा
16 बाळ काळणे सर्प मित्र. आदींना पुरस्कृत करण्यात येणार आहे 
याप्रसंगी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे ,उपाध्यक्ष प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे,सचिव प्रा सुनील कांबळे सर,व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे प्रा डॉ संदीप भोवते,विद्याधर मोहोड, बी. जी.इंगळे सर मंदाताई शिरसाट प्रदीप चोरे,अनिल गवई वर्षा जंजाळ कल्पना महाले यांची उपस्थिती होती


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या