गेस्ट हाऊस मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
आपल्या चिमुकल्या मुलींना लिहिले भाऊक पत्र...
अकोला शहरांमध्ये नवीन बस स्थानकाच्या मागील सदाबहार गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे आज 28 मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आले आहे. युवकाने औरंगाबाद येथील असल्याची नोंद हाॅटेल मधे केले आहे. काल 27 मार्च रोजी संध्याकाळी सहा साडेसहा वाजताच्या दरम्यान सदाबहार गेस्ट हाऊस मध्ये रूम बुक केली होती. मृतकाचे नाव मिलिंद बहरूवाले असून त्याचे ड्रायव्हिंग लायसन अमरावती येथील आढळून आले आहे. सकाळच्या सुमारास साफ सफाई कर्मचारी सफाईसाठी आले असता त्यांना रूमचा आत मधून दरवाजा बंद दिसला. दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हॉटेल मालकांना याची माहिती दिली असता, सदर युवक हा काचाच्या खिडकीमधून पंख्याला गळफास घेतलेला आढळून आला. हॉटेल मालकांनी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. घटनास्थळी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन पंचनामा केला असता सदर युवकाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे आढळून आले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेहाला अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
चिट्ठी नसून आपल्या लाडक्या मुलींना भाऊक लिहिले पत्र...
युवकाने मृत्यूपूर्वी आपल्या मुली गौरी व श्रद्धा यांना मार्गदर्शक पत्र लिहून ठेवले आहे. यामध्ये आपण आत्या व काका यांच्या मार्गदर्शनात आनंदाने जीवन जगण्याच्या सुचना केल्या आहेत. आपण जीवनामध्ये हरलो माझ्यासारखे तुम्ही वागू नका, असेही आपल्या मुलींना त्यांनी या पत्रातून मार्गदर्शन केले आहे. जीवन जगताना कुणावरही विश्वास ठेवू नका व आर्थिक व्यवहार सांभाळून करण्याचे सुद्धा पत्रा मधून आपल्या मुलींना सांगीतले आहे.
काय आहे आत्महत्येचे कारण?
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनाम्या दरम्यान मृतकाजवळ एक भावुक पत्र लिहून ठेवलेले आढळून आले. यामधून आपल्या चिमुकल्या मुलींना मार्गदर्शक सूचना केल्याचे निदर्शनास आले. युवकाच्या मृत्यूचे कारण कौटुंबिक कलाहातून आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी करीत आहेत.
0 टिप्पण्या