नाला खोली करण्याच्या कामांना सुरुवात
बाळापुर तालुक्यातील शेतकरी समृद्धीच्या मार्गावर
अकोला
शेतकऱ्यांच्या बांधावर मृदा व जलसंधारण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आर्थिक वाढ होण्याकरिता तसेच कोरडवाहू शेतीला पाण्याची जोड देऊन शाश्वस्थ पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाला खोलीकरणाची कामे करून मिळत आहेत .
बाळापुर तालुक्यातील खिरपुरी खुर्द, खिरपुरी बुद्रुक, बोर वाकडी, टाकळी, नानखेड, व्याळा पेठ आदी गावात सावित्रीबाई फुले महिला मंडळ देऊळगाव साखरशा व आयसीआयसी बँक यांच्या मदतीने नाला खोलीकरण, जुने शेत तलावातील गाळ काढणे, बांधबंधिस्त रिचार्ज पीठ आदी शेतकऱ्यांना लाभदायक अशी कामे सुरू असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या प्रकारे मिळत आहे .या कामात शेतकऱ्याचा सहभाग निधी व आयसीआयसीआय बँक यांच्याकडून सी एस आर द्वारे ही कामे मार्गी लागत आहेत. असे संस्थेचे प्रकल्प संचालक डॉक्टर नरेंद्र पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या