खेट्री येथे राबविली स्वच्छता मोहीम
प्रतीनीधी- नासिर शेख
पातूर : खेट्री येथे रविवार रोजी नवनिर्वाचित निवडून आलेले सरपंच जहुर खान, यांच्या नेतृत्वात बसस्थानकाला लागून असलेल्या झोपडपट्टी परिसरात १९ फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, झोपडपट्टी परिसरात गेल्या काही महिन्यापासून घाणीचे साम्राज्य झाल्याचे चित्र होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते, याबाबतची दखल घेत सरपंच जहूर खान , ग्राम पंचायत सदस्य सूमय्या बी, मो. रईस, तसेच ग्रामस्थ शेख लाल, शेख निसार, शेख तनवीर, सय्यद समीर, प्रमोद पजई, शेख यासीन, शेख बबलू ,सिद्धार्थ तिडके, शेख सुलतान, आदी ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला
0 टिप्पण्या