भारतीय जनता पक्षाचा सर्व वर्गामध्ये विस्तार करावा- संगीता ताई शिंदे
अकोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती तसेच मन की बात धन्यवाद पत्र विशाल रांगोळी कमलदूत सुषमा स्वराज अवार्ड तरुण धान्य अभियान सेल्फी वन करोड या कामाच्या माध्यमातून तसेच संत महात्म्यांचा आदर्श महापुरुषांचा शिकवण व सुजलाम सुफलाम भारत निर्माण करण्यासाठी मातृ शक्तीने पुढाकार घ्यावा व भारतीय जनता पक्षाचा सर्व वर्गामध्ये विस्तार करावा असे आव्हान सौ. संगीता ताई शिंदे यांनी केले.
अकोला प्रदेशाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ सौ सुहासिनीताई धोत्रे , महानगराध्यक्ष सौ चंदाताई शर्मा यांच्या , मार्गदर्शनात
अकोला समन्वयक सौ. संगीताताई शिंदे आणि सौ भाग्यश्री देशमुख यांच्या उपस्थितीत महानगर कार्यकारिणी तसेच मंडळ पदाधिकारी यांच्यासोबत भाजपा कार्यालयात कार्यालयात बैठक संपन्न झाली*त्यावेळी त्या बोलत होत्या.
अकोला समन्वयक सौ.संगीताताई शिंदे यांनी संत गाडगेबाबा जयंती निमित्त दीप प्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. संगीता ताई शिंदे तसेच भाग्यश्री देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.
सौ रश्मी कायंदे यांनी मंडळ कार्यकारणी, महानगर कार्यकारणी, मन की बात, धन्यवाद पत्रे, G20 विशाल लोगो रांगोळी त्याचप्रमाणे जिल्हा बैठकीचा आढावा मांडला.
सौ संगीताताई शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य करीत कमलदुत, सेल्फी वन करोड,सुषमा स्वराज अवॉर्ड तृणधान्य अभियान राबविणे या सर्वांची माहिती आपल्या भाषणात देऊन सर्व उपस्थित महिलांची सुसंवाद साधला
. संघटन,लव्ह जिहाद,बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. वृंदावन मथुरा येथे सध्या होली पर्व सुरू आहे या निमित्ताने नैसर्गिक रंगाची
होळीचे रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीसाठी सरचिटणीस संजूभाऊ गोटफोडे, माधवभाऊ मानकर,साधना ठाकरे ,मालती रणपिसे, संगीता नानोटे,चंदा ठाकूर, निकिता देशमुख, नीता बागडे, माधुरी क्षीरसागर,रश्मी कायंदे, प्रणिता समरीतकर,वंदना पंचोली, भाग्यश्री मापारी,साधना येवले, मनीषा भुसारी, संध्या लोहकपुरे तसेच सोनल शर्मा आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या