कर्मयोगी श्रीधरराव देशमुख यांचा दोन दिवसीय जन्म शताब्दी जयंती सोहळा उत्साहात संपन्न
जन्म शताब्दी वर्ष साजरी करणाने श्रीधरबाप्पूंच्या कार्याची नव पिढीला प्रेरणापर्वणी- श्री. हर्षवर्धन देशमुख
सर्व समाजाचा एकत्रित विकास या ध्येयाने श्रीधर बाप्पूंचे यशस्वी कार्य - प्रा. अंजलीताई प्रकाश आबंडेकर
निंबा - अकोला जिल्ह्यात निंबा परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याने कर्मयोगी ठरलेल्या स्व. श्रीधराव उपाख्य ‘मालक’ यांचा जन्म शताब्दी महोत्सव तसेच श्रीधर पर्वाचे समारोपीय समारंभ दि. २३ व २४ फेब्रुवारी या दिवशी निंबा येथे थाटात संपन्न झाला. दि. २३ ला निंबा येथील आरोग्य उपकेंद्रात सकाळी १० वाजता संपन्न झालेल्या मोफत आरोग्य चाचणी व रक्त तपासणी शिबिराचे उदघाटन आ. किरणराव सरनाईक तसेच डॉ. सौ. तरंग तुषार वारे (उप-संचालक, आरोग्य विभाग, अमरावती मंडळ) यांच्या शुभ हस्ते झाला. या शिबिरात सेवा देणार्या अकोला येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल बोर्डे, फुप्फूस रोग तज्ञ डॉ. गोपाल गोंडचर, दंत शल्य चिकित्सक डॉ. अमर भुईभार, बालरोग तज्ञ डॉ. सतिष चव्हाण, स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती देशमुख, डॉ. अनुजा देशमुख या नामांकित डॉक्टर चमूचा आपल्या सेवेने उपस्थित गरजू लोकांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधांचे वाटपही केले. याच दिवशी दुपारी २ वाजता, मारोती मढी संस्थान येथे आयोजन समिती द्वारा १०० गरजू महिलांना साडी-चोळी वाटप सौ. साधनाताई प्रकाश पोहरे, प्रांजलीताई नितीन देशमुख, मंजुषाताई रणधीर सावरकर, सौ. अर्चनाताई अनिरुद्ध देशमुख (पं. स. सदस्या) व डॉ. श्रद्धा मनोज महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात करण्यात आले. यानंतर सायंकाळी ५ वाजता गाडगे बाबा व स्व. श्रीधरराव देशमुख यांच्या प्रतिमा असलेल्या पालखी मिरवणुकीचे आयोजन श्रीधरबाप्पू यांच्या जन्मस्थळापासून ते शिवाजी विद्यालय निंबा प्रांगणातील त्यांच्या स्मारकापर्यंत करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये विद्यालयातील लेझीम तथा एन सी सी पथक, ढोल ताशांसह परिसरातील वारकरी मंडळी व दिंडी यांच्या सहभागाने तसेच गाडगे बाबा, भाऊसाहेब व मालकांच्या वेषभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी निंबा व त्यांचे लक्ष वेधले. सायंकाळी ७ वाजता विद्यालयातील स्मारकासमोरील परिसरात एक हजार दिव्यांचा 'ऊजळू सहस्त्र दिप' ह्या दीप महोत्सवाने मिरवणूक सांगता सोहळा संपन्न झाला.
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्याच्या समारोपीय समारंभात सर्वश्री हर्षवर्धनजी देशमुख, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती. गजाननराव पुंडकर व श्री केशवरावजी मेटकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती. प्रा. अंजलीताई प्रकाशराव आंबेडकर, कार्यकारी संपादक प्रबुद्ध भारत, पी. टी. पाटील, माजी पोलीस अधीक्षक, अमरावती, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, महादेवरावजी भुईभार, प्राचार्य कुलट, मानव कल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे मनोज महाजन तसेच महोत्सव आयोजन समिती अध्यक्ष प्रकाशराव पोहरे तथा सचिव हेमंतराव काळमेघ यांची मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या आजीव सभासदांसह उपस्थिति होती.
---------------------------------------------
श्रीधर बाप्पू उपाख्य मालक यांच्या सारख्या कर्मयोगी व्यक्तीमत्वाच्या जन्मशताब्दी महोत्सव आयोजन समितीचा सचिव म्हणून कार्य करण्याचे भाग्य लाभले यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो -- हेमंत काळमेघ,सचिव , महोत्सव आयोजन समिती तथा कार्यकारिणी सदस्य , श्री शिवाजी शिक्षण संस्था , अमरावती.
----------------------------------------
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संग्रहित केलेल्या बाप्पू यांच्या जीवनातील आठवणींचा मालक हा स्मरण गाथा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील संगीत विभागाच्या महिला संचाने प्राध्यापक डॉ. मानकर यांचे नेतृत्वात कार्यक्रमाचे स्वागत गीत श्रीधर बापूंचे गौरव गीत तसेच राष्ट्रगीताचे सुलभ सादरीकरण केले संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक डॉ. मंदा नांदुरकर प्रास्ताविक हेमंतराव काळमेघ, तथा आभार प्रदर्शन कृष्णरावजी देशमुख यांनी केले. दोन दिवसीय समारंभ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण निंबा गावातील महिला व पुरुष वर्ग यांचे सह श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निंबा येथील कर्मचारी तथा महोत्सव आयोजन समिती सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या