Ticker

6/recent/ticker-posts

सागवान झाडांची कत्तल प्रकरण "थंडबस्त्यात"

सागवान झाडांची कत्तल प्रकरण "थंडबस्त्यात"


अमरावतीच्या वन संरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण


नासीर शेख
पातूर : आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत वन विभागाच्या हद्दीतील सोनोना पांढूर्णा रस्त्याच्या कामासाठी दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त  खोदकाम केल्याचे प्रकरण थंडबस्त्यात टाकून आरोपी मोकाटच असून,त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने  मंगेश इंगळे, निलेश सोनोने, पंजाबराव देवकते, रमेश कदम, श्रीवास ,आदी ग्रामस्थांनी गुरुवार दि.२३ फेब्रुवारी पासून अमरावतीच्या मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रस्त्याचे खोदकाम परवानगी पेक्षा जास्त करून सागवान झाडांची कत्तल प्रकरणी ३ डिसेंबर २०२२ अन्वये आलेगाव वन विभागाने वन गुन्ह्याची नोंद केली, मात्र गत दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले नसून, सदर प्रकरण दडपण्याचा आरोप होत असल्याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वारंवार दिलेल्या तक्रारीची दखल न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांनी चक्क अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गुरुवार दि.२३ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रस्त्याच्या कामासाठी ३ मीटर परवानगी असताना, कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने ९ ते १२ मीटर गैरकायदेशीर खोदकाम करून सागवान झाडांची कत्तल करून हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता.


बॉक्स
चौकशीच्या नावावर कारवाई करण्यास दीरंगाई
वन गुन्ह्याची नोंद करून दोन महिने उलटूनही आरोपी मोकाटच असल्याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु वरिष्ठाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगून कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचां आरोपी होत आहे.


बॉक्स
वन विभागाकडून कंत्राटदाराला अभय का ?
आलेगाव वन विभागाने वन गुन्ह्याची नोंद तर केलीच मात्र दोन महिने उलटूनही आरोपी मोकाटच असल्याने आलेगाव वन विभागाकडून कंत्राटदाराला अभय का दिले जाते, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या