खेट्री येथे शांतता समितीची बैठक, ठाणेदाराचे शेकडो ग्रामस्थांना मार्गदर्शन
प्रतीनीधी- नासीर शेख
पातूर : पातूर तालुक्यातील खेट्री येथे ग्राम पंचायतमध्ये शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे व उप निरीक्षक गणेश महाजन यांनी शेकडो ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, गेल्या काही महिन्यापूर्वी ग्राम पंचायतची निवडणूक पार पडली,त्यामुळे गावात वादविवाद होऊ नये या उद्देशाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती,यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे उपनिरीक्षक गणेश महाजन दत्ता हिंगणे,सरपंच जहूर खान,उप सरपंच शेख रजीक,पोलीस पाटील भगवंता ताले,आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते,
0 टिप्पण्या