धक्कादायक! मतमोजणी करतांना अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अमरावतीतून धक्कादायक माहीती हाती आली आहे. अमरावती पदवीधर निवडणूक मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या नेमानी गोडाऊन येथे ही घटना घडली आहे. मंडळ अधिकारीस हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर एकच खळबळ उडाली होती यावेळी सर्वच कर्मचारी मदतीला धावले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर शोककळा पसरली.
नेमके मतमोजणी केंद्रावर काय झाले...
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सकाळपासून मतमोजणी केंद्रावर ते सेवा देत होते. मध्यरात्री अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शाहूराव खडसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शाहूराव यांच्या मृत्यूची वार्ता मतमोजणी केंद्रातील कर्मचाऱ्यांना कळताच सर्वत्र शोककळा परसरली. शाहूराव खडसे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
0 टिप्पण्या