Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. शाळा डोंगरगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

जि. प. शाळा डोंगरगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न


चिमुकल्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.



डोंगरगाव

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या प्रांगणात 31 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषा उपराळे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला पंचायत समितीच्या सदस्या सौ आशाताई इंगळे यांची उपस्थिती होती. डोंगरगाव च्या सरपंच सौ रुपालीताई योगेश नागापुरे  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच किशोर काकडे,पोलिस पाटील राजेश वाघाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा विद्या थोटे,ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये देशभक्तीपर गीत,लोकगीत,टिपरी नृत्य सादर करून शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. व प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देऊन चिमुकल्यांचा उत्साह व्दिगुणित केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी,संगीता मोकळकर, छाया धुर्वे,सिंधुताई  राठोड,अपूर्वा राऊत यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामेश्वर घोरसडे तर उपस्थितांचे  आभार शरद थोरात यांनी मानले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी कार्यक्रमास सफेक्स केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यांचेकडून शाळेला संपूर्ण ध्वनिक्षेपक यंत्रणा भेट देण्यात आली,यावेळी शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन  त्यांचा सन्मान करण्यात आला.व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या