निंबा येथे श्रीधरपर्व सांगता समारोहाचे आयोजन
--- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- - - -
स्व. श्रीधरराव देशमुख उपाख्य मालक जन्मशताब्दी वर्ष सोहळा*
अकोला-- बाळापूर तालुक्यात निंबा परिसरातील थोर सेवा व्रती, स्व. श्रीधररावजी देशमुख उपाख्य "मालक" यांच्या या जन्म शताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षभर राबवविलेल्या सामाजिक उपक्रमांचा सांगता सोहळा दि २३ व २४ फेब्रुवारी या दिवशी निंबा येथे संपन्न होत आहे.
‘श्रीधर पर्व’ या शिर्षका अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या वार्षिक सोहळ्यात आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे पाटील यांचे निंबा गावकऱ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थिनींसाठी व महिलांसाठी वक्तृत्व व रांगोळी स्पर्धा, शेतकर्यांसाठी कृषक मेळावा, १००० वृक्षांचे स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड व संगोपन इत्यादी पूर्व नियोजित समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरे केले आहे.
या वार्षिक सोहळ्याच्या या समारोपीय आयोजनात गुरूवार दि. २३ ला निंबा येथील आरोग्य उपकेंद्रात सकाळी १० वाजता नियोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन डॉ. सौ. तरंग तुषार वारे (उप-संचालक, आरोग्य विभाग, अकोला मंडळ) यांच्या हस्ते होणार असून या शिबिरात सेवा देणार्या अकोला येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल बोर्डे, फुप्फूस रोग तज्ञ डॉ. गोपाल गोंडचर, दंत शल्य चिकित्सक डॉ. अमर भुईभार, बालरोग तज्ञ डॉ. सतिष चव्हाण, एम.डी. मेडिसीन डॉ. सागर इधोळ, स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती देशमुख, डॉ. अनुजा देशमुख या नामांकित डॉक्टर चमूचा सहभाग असून ही चमू उपस्थित गरजू लोकांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधांचे वाटपही करतील. याच दिवशी दुपारी २ वाजता, मारोती मढी संस्थान येथे आयोजन समिती द्वारा १०० गरजू महिलांना साडी-चोळी वाटप सौ. साधनाताई प्रकाश पोहरे, प्रांजलीताई नितीन देशमुख, मंजुषाताई रणधीर सावरकर, सौ. अर्चनाताई अनिरुद्ध देशमुख (पं. स. सदस्या) व डॉ तुषार तरंग वारे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. यानंतर सायंकाळी ५ वाजता गाडगे बाबा व स्व. श्रीधरराव देशमुख यांच्या प्रतिमा असलेल्या पालखी मिरवणूकीचे आयोजन श्रीधरबाप्पू यांच्या जन्मस्थळापासून ते शिवाजी विद्यालय निंबा प्रांगणातील त्यांच्या स्मारकापर्यंत करण्यात आले असून सायंकाळी ७ वाजता या स्मारक परीसरात एक हजार दिव्यांचा 'ऊजळू सहस्त्र दिप' ह्या दीप महोत्सवाने मिरवणूक सांगता सोहळा संपन्न होईल.
शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी स्व. श्रीधरराव देशमुख जन्म शताब्दी महोत्सव समारोप समारंभ तथा 'मालक’ या स्मरण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा श्री शिवाजी विद्यालय निंबा प्रांगणात सकाळी १० : ३० वाजता संपन्न होईल. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी कृषी मंत्री मा. श्री. हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख (अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती ) तथा प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर (कार्यकारी संपादक , प्रबुद्ध भारत), श्रीधरपर्व आयोजन समिती अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, लक्ष्मणराव तायडे (माजी आमदार, बाळापूर), डॉ. अनिता राठोड (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग) व पी. टी. पाटील (माजी पोलीस अधिक्षक, अमरावती विभाग) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या दोन-दिवसीय सेवात्मक तथा विशेष प्रबोधनीय सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन सर्व आयोजन समितीच्या वतीने समितीचे सचिव तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले आहे.
0 टिप्पण्या