कोकण विदर्भ ग्रामीण बँकेचे वेगळे स्थान- प्रबंधक प्रवीण बोंडे
अकोला
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बँकेच्या कायदा नियमानुसार सर्वांना न्याय देण्याची साठी आर्थिक सबलीकरण करिता कर्मचारी वर्ग सेवा आणि धर्म मानवतेचे कार्य करण्यासाठी तत्पर राहतात त्यांना ग्राहकांना सेवा करणे व चांगली सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य म्हणून कार्य करत असतात त्यामुळे कोकण विदर्भ ग्रामीण बँकेने वेगळे स्थान प्राप्त केले आहे असे प्रतिपादन क्षत्रिय प्रबंधक प्रवीण बोंडे यांनी केले- विदर्भ कोकण ग्रामीण बँक, कान्हेरी सरप येथील स्थानांतरीत नविन शाखेचे थाटात उद्घाटन -ते प्रसंगी ते बोलत होते
कान्हेरी सरप येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा स्थांनातरण सोहळा थाटात पार पडला . कार्यक्रमाला बँकेचे अकोला क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक श्री प्रविण बोंडे अध्यक्ष म्हणून लाभले, व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री गोपाल भटकर, अकोला शाखेचे शाखा प्रबंधक श्री प्रमोद पाटील, सौ. श्रेया कुलकर्णी व सेवानिवृत्त अधिकारी श्री सुनिल अलकरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी सदैव तत्पर राहत असून ग्रामीण भागातील जनजीवन समृद्ध करण्यासाठी बँकेचा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक सौ अरुणा खेडकर यांनी केले व शाखेबद्दल विस्तृत माहिती दिली. क्षेत्रीय प्रबंधक श्री प्रविण बोंडे यांनी शासनाच्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सहायक प्रबंधक शारदा देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन रोखपाल अश्विनी पवार यांनी केले. कार्यक्रमास शंभरच्या जवळपास ग्रामस्थांनी हजेरी लावली होती, व कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्विते करीता अशोक ठाकरे जागा मालकांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच गोकुळ खंडारे, संतोष शिंदे, सौ. रेखा तुपवाडे, सौ कोमल लुंगे, सौ विशाखा गवई, श्री श्रीराम तूपवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या