Ticker

6/recent/ticker-posts

पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अकोल्यात भाजपला मोठा झटक

पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अकोल्यात भाजपला मोठा झटका


अकोला- विदर्भातील नागपूरनंतर अमरावती विभागात भाजपला २४ तासांत दुसरा धक्का बसताना दिसत आहे. नागपूर विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनंतर अमरावती विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा ३३८२ मतांनी पराभव केला. निवडणुकीत विजयासाठी 47101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता, मात्र एकाही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत. त्यानंतर लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 तर डॉ.रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली, पाटील गेल्या दोन टर्म सातत्याने या जागेचे प्रतिनिधीत्व करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषवले. नागपूर आणि अमरावती विभागातील दोन्ही जागांवर भाजपचे दोन्ही उमेदवार सलग दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य होते. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी मोठा पराभव केल्याने अमरावती विभागाच्या निकालावर दोन्ही पक्षांचे लक्ष लागून राहिले होते, अखेर धीरज लिंगरे यांनी बाजी मारली, यानंतर काँग्रेसजनांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या