Ticker

6/recent/ticker-posts

बजेट मधुन नोकरदार मध्यम वर्गीयांना थेट फायदा मिळेल असे वाटत नाही- डॉ प्रसन्नजीत गवई

बजेट मधुन नोकरदार मध्यम वर्गीयांना थेट फायदा मिळेल असे वाटत नाही- डॉ प्रसन्नजीत गवई 


आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२४ च्या अनुषंगाने घोषणांचा पाऊस पाडलेला दिसतो. कर रचनेत सरसकट ७ लाखांपर्यंत सुट न देता टॅक्स रिबेट च्या माध्यमातुन गुंतवणूकीची मर्यादा ५ लाखावरुन ७ लाख करण्यात आली त्यामुळे नोकरदार मध्यम वर्गीयांना थेट फायदा मिळेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांना फारसा दिलासा दायक असा अर्थसंकल्प म्हणता येणार नाही. रोजगार निर्मिती व महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित होत्या. कुटुंबाचे बजेट सुधरणारा अर्थसंकल्प असेल असे वाटले होते परंतु गृहिणींची सुद्धा निराशा झाली. दरडोई उत्पन्न १.९७ लाख असल्याचे सांगितले पन कुणाच्या उत्पनात वाढ झाली हे पाहणे गरजेचे वाटते.




डॉ प्रसन्नजीत गवई 
अर्थशास्त्र विभाग प्रमुख 
सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या