वाघजाळी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
शिवाजी महाराज हे डोक्यावर नाही तर, डोक्यात घ्या,,,,अंतकला वानखडे (शिक्षिका , जि प शाळा वाघजाळी)
बार्शीटाकळी:- येथुन जवळच असलेल्या वाघजाळी (वरखेड) येथे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप आणि पंचशील मंडळ वाघजाळी यांच्या अथक प्रयत्नाने शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजकांनी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम,आयोजित केला होता यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाळी च्या विद्यार्थ्यान्नी आपल्या नृत्य आणि अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वप्रथम गावचे जेष्ठ नागरिक गहनिनाथ इंगळे यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन केले तर गावचे सरपंच अरुणाबाई सोळंके आणि उपसरपंच ज्ञानेश्वर दांडले यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्य डॉ. बोबडे आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ अंतकला वानखडे यांनी आपले प्रास्ताविक पर भाषण सादर केले तर सचिन गालट यांनी मुख्य भाषण करून तरुणांची मने जिंकली यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक मोहन इंगळे, बबलू इंगळे, अमित घोगरे, अनिल शेंडे, उमेश चिंचोळकर, आणि
पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक, गावातील सर्व महिला मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यकरामाचे सूत्रसंचालन शरद करवते , तर आभार प्रदर्शन शिलवंत खंडारे यांनी केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या