खेंडकर विद्यालयात सार्वजनिक शिवजयंती उत्साहात
अकोला:
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक वाशिम बायपास स्थीत खेंडकर विद्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपुर्ण भारत वर्षास प्रेरणादायी आहे, शिवजयंतीच्या औचित्याने खऱ्या इतिहासाचे स्मरण व्हावे करीता विध्यार्थीनी मा जिजाऊ चे वेशभूषा साकारून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेडकर यांची प्राथनीय उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सशक्त भारत च्या जडणघडणीत शिवाजी महाराजांच्या विविध कौशल्याचा,त्यांच्या आचार-विचारांचा उपयोग करून उद्याची पिढी मजबूत व्हावी करिता शिवाजी महाराजांचे विचार घर-घरात पोहचणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी शाळेला सुट्टी असल्यानंतरही विद्यार्थ्यांचा उत्साह बघावयास मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उषा जगदाळे यांनी केले तर आभार सौ. कांचन वानखडे यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक प्रज्ञानंद थोरात, प्रशांत काळे, गोपाल वानखडे, आशा हिवरकर व शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या