Ticker

6/recent/ticker-posts

राजकीय मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे

राजकीय मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे



धनुष्यबाणावर निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निकाल, वाचा सविस्तर 



आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगातून आली आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण व शिवसेना हे नाव नक्की कोणाला मिळणार ? उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदेंना या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु होती. आज ४ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या संदर्भात सुनावणी सुरु करण्यात आली होती, आणि या प्रकरणी आता निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. 


निवडणूक आयोगाने दोन्ही गटांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्र व शपथपत्र पडताळून शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एकनाथ शिंदेंचा गट हाच खरी शिवसेना असल्याचा निर्णय सुद्धा या निकालातून देण्यात आल्याने हा उद्धव ठाकरेंची मोठी धक्का मानला जातो आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेनेचं चिन्ह व नाव मिळाल्याने आता उद्धव ठाकरे यांचे पुढचे पाऊल काय असले याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या