आलेगाव वनपरिक्षेत्रात रस्त्याच्या कामात सागवान झाडाची कत्तल प्रकरण
वन गुन्ह्याची नोंद : अडीच महिन्यापासून आरोपी मोकाटच
नासीर शेख
पातूर : आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या कामासाठी दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करून सागवान झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ३ डिसेंबर २०२२ अन्वये आलेगाव वन विभागाने वन गुन्ह्याची नोंद केली, अडीच महिन्याची कालावधी उलटूनही आरोपींना चौकशीसाठी अद्यापही ताब्यात घेण्यात आले नाही, आलेगाव वन विभागाने, वन गुन्ह्याची नोंद केल्यावर आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन गैरकायदेशीरपणे परवानगी पेक्षा जास्त खोदकाम व अवैध सागवान झाडांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पोकलेन, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर, आदी साहित्य जप्त करण्यात आले नाही, संबंधित कंत्राटदार यांनी मनमानी पद्धतीने परवानगी पेक्षा जास्त रस्त्याचे खोदकाम करून सागवान झाडांची कत्तल केल्याचे वनविभागाच्या चौकशीत उघडकीस आले. वन गुन्हा नोंद करून आरोपी मोकाटच असल्याने याप्रकरणी चौकशी थंडबस्त्यात असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया
रस्त्याच्या खोदकामासाठी दिलेल्या परवानगीची कालावधी संपली आहे. तसेच त्यामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर कामाला परवानगी देण्यात येईल अर्जुना के आर उपवनसंरक्षक अधिकारी अकोला
प्रतिक्रिया
वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या खोदकामासाठी दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करून झाडांची कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे वन गुन्ह्याची नोंद केली असून, चौकशी सुरू आहे. खोदकाम काम करून झाडांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य लवकरच जप्त करण्यात येईल विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव
बॉक्स
राजकीय दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करून सागवान झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आल्यानंतरच वन गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती, परंतु अडीच महिने उलटूनही राजकीय दबावामुळे सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची परिसरात चर्चा आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या