जिल्ह्यात सम्राट अशोक गौरव रथयात्रा काढणार
सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त ३१ मार्च २०२३ ला सम्राट अशोक पर्व महोत्सव अकोला येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून स्थानिक अशोक वाटिका येथून विविध लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ होऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह गावागावांत सम्राट अशोक गौरव रथयात्रा फिरेल, अशी माहिती आज प्रा. विजय आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३१ मार्च रोजी सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी दिल्ली येथील धम्म क्रांतीचे शिलेदार, दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, भन्ते ज्ञानज्योती महाथेरो मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सम्राट अशोक यांची जयंती, राष्ट्रीय पर्व म्हणूनघोषित झाली पाहिजे, ही जयंती
शासन प्रशासन, तसेच भारतीय जनतेने उत्साहात साजरी केली करण्यात येईल. पाहिजे, त्यांच्या प्रतिमा आणि अशोक स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, ग्रामपंचायत , शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था या ठिकाणी असलीच पाहिजे, याची माहिती जिल्ह्यातील गावांमध्ये लोकांना व्हावी यासाठी अकोला शहरात अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत सम्राट अशोक गौरव रथयात्रा असेल तर अकोला तालुक्यातील प्रमुख गावातून ही यात्रा जाणार असून प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात येईल. तालुक्याच्या ठिकाणी रथ यात्रेचे जंगी स्वागत आणि मिरवणूक काढण्यात येईल.ही यात्रा स्थानिक अशोक वाटिका अकोला येथून २५ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असुन, रथ यात्रेचा समारोप २७ फेब्रुवारी रोजी पातूर या ठिकाणी होणार आहे. अशी माहिती चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विजय आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. रथ यात्रेचे उद्घाटन भन्ते ज्ञानज्योती, भन्ते बुद्धपाल, भन्ते धम्मपाल, भन्ते शाक्यपुत्र, राहुल भन्ते, बोधानंद भन्ते, नागसेन भन्ते, शीलरक्षिता भन्ते, चंद्रमणी तसेच भिक्खू संघाची उपस्थिती असेल तर सुगत वाघमारे, डॉ. प्रा. एम. आर. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, ओबीसी नेते संतोष हुशे, प्रदीप चोरे, अॅड. संतोष कोल्हे, तिडके, गवई, संतोष भालदार, सिनेट सदस्य डॉ. संतोष बनसोड, डॉ. रवींद्र मुंद्रे, डॉ प्रा बी. एच. कीर्दक, डॉ संतोष पेठे, दगडु वाहुरवाघ, डॉ विलास तायडे, डॉ वसंत डोंगरे, नंदकिशोर सरदार इत्यादी याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सम्राट अशोक पर्व महोत्सव प्रचंड ताकदीने साजरा 2 व्हावा ही भावना असणाऱ्या पातूर अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शी टाकळी, अकोला या तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील पुरोगामी चळवळीतील संस्था संघटना, विविध जातीय धर्मीय व्यक्तींनी या रथयात्रेत सहभागी व्हावे, तसेच अशोक पर्व महोत्सव यशस्वी करावे, असे आवाहन याप्रसंगी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोलाच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, व्यवस्थापक प्रा. सुनील कांबळे, सचिव प्रा. शैलेश इंगळे, प्रा. डॉ. संदीप भोवते, विद्याधर मोहोड, बी. जी. इंगळे, मंदा शिरसाट, प्रदीप चोरे, भीमराव गोपनारायण, अनिल गवई यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या