TCB News चे संपादक जफर खान यांचा हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला
आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001-2015 प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य साजरा केला जाणारा ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
काळाच्या बदलणाऱ्या पत्रकारितेच्या अनुषंगाने केवळ प्रिंट मीडिया करतानाच इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये आज बुलढाणा जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे या त्याचा एकूण कामाची दखल घेत पत्रकारितेतील राज्यस्तरीय सन 2023 चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर झाला.
राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल TCB News न्यूज चे संपादक जफर खान यांचा पत्रकार सम्मान पत्र पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे नांदुरा विधानसभा क्षेत्राचे मा.आमदार राजेश एकडे,मलकापूर मलकापूर तहसीलदार राजेश सुरडकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, जेष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी, जेष्ठ पत्रकार हनुमानभाऊ जगताप, जेष्ठ पत्रकार उल्हासभाई शेगोकार, हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर इ.मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या