राजुबाबा नगरीची सिमरन गवई हिला राज्यस्तरीय बॉक्सिंग रजत मिळाली मिनी ओलंपिक मधे ऐन्ट्री
सिद्दोधर गवई यांची कन्या सिमरन गवई हिने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रजत पदक मिळविले आहे. तसेच तिने मिनी ओलंपिक मध्ये खेळण्याची सुवर्ण संधी खेचून आणली आहे. सिमरन ही मांगीलाल शर्मा महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. आपल्याला मिळविलेल्या यशाचे श्रेय ती आपल्या आई-वडील व गुरुजनांना देते यावेळी परिसरामध्ये तिचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले आहे व तिच्या उज्वल भविष्या साठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गजानन वाडेकर, मयूर गुजर, आकाश ढमके, सोनू भोंबडे, कुंदन पटेल, गजानन देशमुख व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या