Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी कर्मचारी शासकीय (मोबाईल) ११ जानेवारी पासून करणार परत

अंगणवाडी कर्मचारी शासकीय (मोबाईल) ११ जानेवारी पासून करणार परत


 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक चे जिल्हा परिषद अकोलाला निवेदन.!


 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखा अकोला बैठक ६ जानेवारी २०२३ रविवार रोजी कॉ. दुर्गा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्याचे नेते कॉ. रमेश गायकवाड, राज्य संगठन सचिव काँ. नयन गायकवाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटक कार्यालयात संपन्न झाली.

अंगणवाडी कर्मचारी यांना आश्वासन दिल्या प्रमाणे मानधन/वेतन वाढ करा. थकीत असलेला प्रवास भत्ता अदा करा, सूपरवायझर पदभरती करताना वय ५५ व शिक्षण १० वी. २००२ शासन निर्णया प्रमाणे भरण्यात यावी व इतर प्रलंबित मागण्या बाबत व शासनाने २०१९ ला दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत अशा अनेक तक्रारी यापूर्वी शासन व प्रशासनाकडे केले परंतु अजून पर्यत नविन मोबाईल दिले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका अडचणीत सापडले आहेत. आतातर मोबाईल चालत नाही अँप डाऊनलोड होत नाही झालेतर भरलेली माहीती अपलोड होत नाही इत्यादी समस्या असल्याचे मत शेकडो महिलांनी बैठकीत ठेवल्या. चांगल्या प्रतिचा ,मोबाईल द्या .पोषण टँकर मराठी द्या या मागणीसाठी १७ आँगस्ट ते २८ आँगस्ट २०२१ या कालावधीत राज्यभर शासनास मोबाईल परत करण्यात आले होते. मा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संघटना प्रतिनिधीची सोबत बैठक घेवून नविन मोबाईल देण्यात येईल असे आश्वासन दिले .त्यानुसार शासनास प्रस्ताव दिला *बजेट अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने नविन मोबाईल साठी दहा हजार रुपये देण्यास येईल असे बजेट मध्ये तत्कालीन वित्त मंत्री अजीतदादा पवार यांनी मंजूर केले परंतु अंगणवाडी सेविकांना मोबाईल अजून पर्यत देण्यात आले नाही. शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा ऍप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे. ११ जानेवारी पासून अकोला जिल्ह्यातील सर्व सेवीका शासकीय बोंबल्या (मोबाईल) बालविकास प्रकल्पात कार्यालयात परत करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बैठकीत विविध स्थानिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली, त्यात खालील निर्णय घेण्यात आले


 अंगणवाडी कर्मचारी यांना आश्वासन दिल्या प्रमाणे मानधन/वेतन वाढ करा. थकीत असलेला प्रवास भत्ता अदा करा, सूपरवायझर पदभरती करताना वय ५५ व शिक्षण १० वी. तसेच २००२ शासन निर्णया प्रमाणे भरण्यात यावी व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होई पर्यंत ११ जानेवारी २०२३ पासुन शासकीय मोबाईल परत करण्यात येईल, मागील महिन्या पासुन मासिक अहवाल सेविका आँनलाईन काम बंद., पोषण टँकर स्वताच्या मालकी च्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करणार नाही.  
इत्यादी निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. व मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात व मा. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी क्र. २ यांच्या व्दारे मा. मुख्यमंत्री, व इतर मंत्री महोदय यांना निवेदन बैठकी नंतर देण्यात आले आहे. व सर्व मा. बालविकास प्रकल्प अधिकारी यांना ई-मेलव्दारे पाठण्यात येणार आहे. बैठकीत व निवेदन देताना कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. दुर्गा देशमुख, कॉ. त्रिवेणी मानवटकर, कॉ. आशा मदने, कॉ. ज्योती ताथोड, कॉ. मंगला अढावु, कॉ. मंगला मांजरे, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. प्रल्हाद मदने, कॉ. प्रशांत कडू, कॉ. हाजरा परवीन है उपस्थित होते सभेचे संचालन कॉ. ज्योती ताथोड, आभार कॉ. मंगला मांजरे यांनी केले. असे आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कॉ. सुनिता पाटिल कळवितात.!



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या