Ticker

6/recent/ticker-posts

चक्रवर्ती अशोक प्रतिष्ठान चे पाठीशी खंबीर पने उभे रहा..

चक्रवर्ती अशोक प्रतिष्ठान चे पाठीशी खंबीर पने उभे रहा.. 


 प्रा डॉ संदीप भोवते.संवाद सभेला उस्फुर्त प्रतिसाद


           आंबेडकरी समूहाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक उत्कर्षासाठी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान ची स्थापना महत्वपूर्ण ठरणार असून सद्य परिस्थितीत आंबेडकरी समूहाच्या, व बहुजन समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्रतिष्ठान चे वतीने सुरू करण्यात आले आहे म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील ,पुरोगामी चळवळीतील समाज बांधवांनी सम्राट अशोक प्रतिष्ठान चे पाठीशी खंबीर पने उभे राहून तन मन धनाने साथ दिली पाहिजे असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत डॉ प्रा संदीप भोवते यांनी केले चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान चे वतीने जिजाऊ सभागृह मराठा सेवा संघ कार्यालय अकोला या ठिकाणी आयोजित संवाद सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते
 या प्रसंगी विचार पिठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा विजय आठवले उपाध्यक्ष प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे,सचिव प्रा सुनील कांबळे व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे मा. सुनील तायडे विद्याधर मोहोड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती,कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणातून प्रा विजय आठवले यांनी जिल्ह्यात सर्वात मोठे बौद्ध धम्म संस्कार केंद्र, निवासी अभ्यास केंद्र,रोजगार प्रशिक्षण ,विपश्यना केंद्र,सोबतच अशोक स्तंभ निर्मितीचा* संस्थेचा संकल्प जाहीर केला
 प्रा _डॉ बाळकृष्ण खंडारे_यांनी सम्राट अशोक प्रतिष्ठान साठी बौध्द समुहासाठी पर्वणी म्हणून सिद्ध होईल अशी ग्वाही दिली
 तर प्रा सुनील कांबळे यांनी _संस्थेचे प्रत्येक काम पारदर्शक_ असेल असेल म्हणून लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले
,प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सुनील तायडे सर यांनी शासकीय मदत मिळवून प्रतिष्ठान मोठे करता येईल त्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले तसेच प्रतिष्ठान साठी एक महिन्याचा* पगार देण्याचे घोषित केले,
 सामाजिक कार्यकर्ते अनिल गवई* यांनी सुद्धा आर्थिक मदती सोबत मनुष्य बळाची मदत देण्याचे जाहीर केले, प्राचार्य रत्नदीप थोरात यांनी_ सुद्धा महत्वपूर्ण सूचना देवून सहकार्य करण्याचे घोषित केले संवाद सभेत प्रा डॉ सुमेध कावळे सर यांनी प्रतिष्ठान चे उदिष्टे कौतुकास्पद असून आपण भरीव योगदान देऊ असे आश्वासन दिले ,राजकुमार वानखेडे सरोज ताई वाकोडे , रेखा ताई चव्हाण सत्य सागर*तायडे_ , विद्याधर मोहोड, अशोक_गुडदे,वंदना रावळे ताई प्रा रावले सर आदींनी सहभाग घेत मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठान साठी सर्वच प्रकारची भक्कम मदत देण्याचे जाहीर केले संस्थेच्या पहिल्याच सभेला आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी हजेरी लावत उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संदीप भोवते ,तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन,आभार प्रदर्शन संस्थेचे _व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे_यांनी मानले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या