दुर्दैवी घटना! तलावात दोन युवकांचा बुडून मृत्यु
प्राप्त माहीती वरुन कान्हेरी येथील आपल्या परीवारासह कारखान्यात काम करणारे मध्य प्रदेशातील मजुरांपैकी अनील शन्नीलाल उईके वय 28 वर्ष रा. ब्रजपुरा ता. जुन्नारदेव जि. छिंदवाडा म.प्र. पुष्पेंद्र कनस कुमरे वय 25 वर्ष रा.पसलाई ता. जी. बैतुल म.प्र. हे दोनजण मित्रांसोबत. पाण्यात उतरले असता दुरवर पोहत गेले आणी तलावात अचानक बेपत्ता झाले
या वेळी सोबतचे दोन्ही मित्र घाबरत बाहेर आले आणी परीवारात माहीती दीली या घटनाची माहिती सायंकाळी बार्शिटाकळी पोस्ट.स्टे. ला मिळताच बार्शिटाकळी चे ठाणेदार सोळंके साहेब यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना देऊन लगेचच सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले. यावेळी लगेच जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांना माहीती दीली लगेच संदीप साबळे साहेब यांनी रेस्क्यु बोट रवाना केली आणी दिपक सदाफळे जिवरक्षक आणी त्यांचे सहकारी ऋशिकेश राखोंडे, कीशोर तायडे, विष्णु केवट, अंकुश सदाफळे, जितेंद्र केवट, आकाश बागाडे, आणी रेस्क्यु बोट व शोध बचाव साहीत्यासह घटनास्थळी पोहचले यावेळी तलावात सर्च ऑपरेशन चालु केले असता सोबत असलेल्या मित्रांनी बुडालेल्या अवस्थेत जागा दाखवली असता तेथे काही दिसुन येत नव्हते पुन्हा दिपक सदाफळे यांनी सोबतच्यांना बारकाईने विचारपुस केली असता त्या ठिकाणी अंडर वॉटर सर्च केले असता तलावात तळाशी एक मोठी विहीर आणी त्या मध्ये अं. 15-20 फुट खोल पाणी असल्याचा अंदाज आला तेव्हा जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी क्वीक प्लॅनींग केली आणी विहीरीत सर्च ऑपरेशन चालु केले तेव्हा लगेच एक तळाशी मृतदेह हाती लागला त्याला वर आणले परत दुसरा शोधण्यासाठी तळाशी गेले असता तीस-या टप्प्यात दुसरा मृतदेह पण हाती लागला दोन्ही मृतदेह पोलीस आणी नातेवाईकांच्या ताब्यात दीले यावेळी बार्शिटाकळी पोस्ट. स्टे चे ठाणेदार सोळंके सर आणी पोलीस कर्म चारी हजर होते अशी माहीती दिपक सदाफळे यांनी दीली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या