Ticker

6/recent/ticker-posts

मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर कुमार व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची आज अकोल्यात बैठक

मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर कुमार व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची आज अकोल्यात बैठक


अकोला रेल्वे स्थानकावर  मिळणार अत्याधुनिक सुवीधा



अकोला
रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कटिबद्ध असून अकोला लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी तसेच रेल्वे प्रवाशांना कोणती अडचण येऊ नये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या नियोजनाने आराखडा अंतिम रूप देऊन वेगवेगळ्या विकास कामाचा आढावा खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी आज घेऊन प्रवाशांची अपेक्षा अकोला महानगराच्या दृष्टीने अपेक्षित कामे याबाबत आमदार सावरकर यांनी सूचना दिल्या. मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर कुमार व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची आज अकोल्यात बैठक घेण्यात आली या बैठकीत रेल्वे अधिकारी तसेच आमदार रणधीर सावरकर मध्य रेल्वे चे सल्लागार समितीचे निर्वाचित सभासद वसंत बाछुका यांच्या उपस्थितीत अनेक सूचना नुसार कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला
प्लॅटफॉर्म नंबर दोन वरली नऊ फरवरी सुरू करण्यात येणार आहे तसेच प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाच इथे सुद्धा लिफ्टचे काम प्रगतीपथावर आहे एलिव्हेटर संदर्भात सुद्धा पाहणी करण्यात आली व लवकरात लवकर काम करण्याची निर्देश आमदार सावरकर यांनी दिले यावेळी पार्किंग व्यवस्था संदर्भात चर्चा करण्यात आली लवकरच एक हजार फुटाची प्लॅटफॉर्म काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्याचा काँक्रिटीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच शकुंतला एक्सप्रेस इंजिन सुद्धा रंगोटी करण्यात आली आहे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित कामांना मान्यता प्राप्त करून लवकरच अकोला रेल्वे स्टेशनची नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यावेळी पोलीस प्रशासन रेल्वेचे अधिकारी तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते यावेळी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने अनेक सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या व कामाचा आढावा घेतला व लवकरात लवकर नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या