Ticker

6/recent/ticker-posts

शास्त्री स्टेडियम येथे मूकबधिर विद्यार्थांनी केली रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती

शास्त्री स्टेडियम येथे मूकबधिर विद्यार्थांनी केली रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती 


26 जानेवारी 2023 रोजी शास्त्री स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज मानवंदना कार्यक्रमामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला व सुमिरमा फाउंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नवी संकल्पना मांडली व त्यांनी कनुभाई वोरा अंध विद्यालय अकोला व बगाटे मूकबधिर विद्यालाय, कैलास टेकडी अकोला या विद्यर्थ्यांना घेऊन रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती केली यातून वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेटचे महत्त्व, वाहतूक वेग नियंत्रण अशे अनेक प्रकारचे संदेश दिले आणि जर आम्ही अंध व मुखबधिर विद्यार्थी या नियमाचे पालन करु शकतो तर तूम्ही सर्व्ह सामान्य व्यक्ती का नाही अशी विनंती या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आले.


 यामध्ये मा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती. जयश्री दुतोंडे मॅडम, मोटार वाहन निरीक्षक श्री.संदीप तुरकने, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री गजानन हरणे, श्री मनोज शेळके व कर्मचारी श्री.सोळंके, श्रीमती हर्षदा चवात ,श्रीमती छाया डिवरे, सुमिरमा फाउंडेशन अध्यक्ष डॉ.पुजा खेतान मॅडम, आशिष खिल्लारे, विशाल धांडे, मिल्टन कांबळे, धर्मेंद्र शिरसाट, स्वप्नील मादोळे, मंगेश सूर्यवंशी, शिवानी राजूरकर, गीता मोर्य, प्रमोद जाधव, सूरज हिवाळे, शंकर कांकाळ, विक्की मोरे, तेजस मोरे , शैलेंद्र बागाटे, हिना चौधरी. आदि उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या