Ticker

6/recent/ticker-posts

वॉक फॉर चाईल्ड वॉकेथॉन मध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा - उद्योजक सुगत वाघमारे

वॉक फॉर चाईल्ड वॉकेथॉन मध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा - उद्योजक सुगत वाघमारे  


 अकोल्यात तिक्ष्णगत महोत्सवास थाटात प्रारंभ 



 अकोला : दिवंगत गुंफाबाई ग्यानेश्वर वाघमारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तथा तिक्ष्णगत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यात तिक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम तथा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज १६ डिसेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या तिक्ष्णगत महोत्सवाची सुरुवात वुई द पीपल, भारतीय संविधानाची गौरवगाथा या संगीतमय महानाट्याने करण्यात आली.


आज शुक्रवारी संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह अकोला येथे संगीत दिग्दर्शक तथा निर्माता जॉली मोरे व भारतीय महिला शाहीर सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवराय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर संगीतमय प्रकाश टाकला . शेकडो अकोलेकरांनी हा संगीतमय कार्यक्रम पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांच्या कुशल मार्गदर्शनात या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उद्या शनिवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता ‘वॉक फॉर चाइल्ड‘ या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 
बालकांचे हक्क व अधिकारांसाठी या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले असून बालस्नेही पोलीस केंद्र, सिव्हील लाईनपासून या वॉकथॉनची सुरुवात होऊन नेहरू पार्क चौक - अशोक वाटिका मार्गे शास्त्री स्टेडियम अकोला येथे समारोप होईल. बालकांवर होणारे अन्याय व अत्याचार याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजात या संदर्भात जनजागृती करण्यासाठी अशाप्रकारे संपूर्ण देशभरात प्रथमच या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुगत वाघमारे यांनी दिली, या उपक्रमात बहुसंख्येने समाजातील सर्व स्तरातील घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुगत वाघमारे यांनी केले आहे. बालकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले असून, देशातील प्रत्येक नागरिकाने बालकांप्रति संवेदनशील होण्याची गरज असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 
१७ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान दोन गटांमध्ये तिक्ष्णगत चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन शास्त्री स्टेडियम, टॉवर चौक, अकोला येथे करण्यात आले आहे. तर १८ डिसेंबर रोजी सम्यक संबोधी संस्था, रणपिसे नगर, अकोला येथे गायन आणि नृत्य स्पर्धेची ग्रँड फायनल होणार आहे. २४ डिसेंबर रोजी या दिमाखदार तिक्ष्णगत महोत्सवाचा समारोप शास्त्री स्टेडियम येथे संपन्न होणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या