Ticker

6/recent/ticker-posts

नाल्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात भीमनगर येथील नागरिकांचे हाल !

नाल्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात भीमनगर येथील नागरिकांचे हाल ! 


साफसफाई च्या नावावर उचलली जातात लाखो रुपये !


अकोल्या शहरातील जुने शहरातील प्रभाग क्र. ९ भीमनगर रमाबाई चौक जुने शहर, बुद्ध विहाराच्या बाजूला संपूर्ण नाली चॉकअप झाल्यामुळे नालीचे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिका पश्चिम झोन येथील क्षेत्रीय अधिकारी तसेच महापालिकेचा कोणताही सफाई कर्मचारी या या परिसरात येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला तसेच या परिसरातील नगरसेवकाला भरगच्च मताने निवडून आणले होते. निवडून आल्यानंतर सुद्धा या नगरसेवकाने एक काम सुद्धा धड केले नसल्याचे स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवले.
नगरसेवक निवडून आल्यापासून या परिसरात दिसत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील साफसफाई करिता लाखो रुपयाचे बिले काढली जातात मात्र साफसफाई होत नसल्याचा आरोप भीम नगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. वारंवार नगरसेवक तसेच पश्चिम दोन येथील क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून सुद्धा आले नाहीत गेल्या तीन दिवसापासून रस्त्यावर तसेच लोकांच्या घरामध्ये नालीचे पाणी शिरले असून अद्यापही कुठले नगरसेवक क्षेत्रीय अधिकारी यांनी येऊन न पाल्याचा आरोप चालक भीम नगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. या परिसरातील मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी व सम्राट अशोक सेनेचे आकाश शिरसाट यांनी लवकरात लवकर समस्यांना सोडण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या