Ticker

6/recent/ticker-posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा


पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शाम खुळे याच्या कार्ला येथील शेत शिवारात दोन दिवसा आधी घडलेल्या घटनेने परिसरात खडबड उडाली होती. ९ डिसेंबर रोजी बंडू या व्यक्तीचा कार्ला शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती पातुर पोलिसांना दिली. पातुर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला मृतकाचे नाव बंडू डाखोरे वय ४५, राहणार सावरगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तो मागील तीन-चार दिवसापासून बेपत्ता असल्याची पत्नी मीरा बंडू डाखोरे (वय ३५) यांनी पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पातुर पोलिसांनी तपास केला असता, बंडू डाखोरे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न आले.  मृतकाच्या पत्नीसह अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली. आरोपी प्रेमी गजानन शेरू बावणे वय वर्ष 18 व मृतक बंडू ची पत्नी नाव मीरा बंडू डाखोरे वय वर्षे 35 राहणार सावरगाव हे कुटुंब शेती कामाकरिता कार्ला येथे आले होते. मृतक बंडूची पत्नी व प्रेमी गजानन शेरू बावणे हे फोन कॉल च्या माध्यमातून संपर्कात आले असता, आरोपी गजानन बनवणे व मृतक बंडू यांच्यात शाब्दिक वाद झाला व आरोपी व मृतक पत्नी यांनी बंडूचा गळा रुमालाने आवळून विहिरीत ढकलण्याची कबुली आरोपी गजानन शेरू बावणे यांनी पोलिसांना दिली. आरोपी गजानन शेरू बावणे यांच्या विरोधात पातुर पोलिसांनी अपराध क्रमांक 394/22 कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी गजानन शेरू बावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पातुर ठाणेदार हरीश गवळी यांच्यासह पोलीस जमदार अरविंद पवार, हेड कॉन्स्टेबल पिंगळे व इतर पोलीस कर्मचारी करीत आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या