Ticker

6/recent/ticker-posts

राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौध्द महासभेच्या नियंत्रणामध्ये अकोल्यात होणार बौद्धांची स्वतंत्र बँक

राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौध्द महासभेच्या नियंत्रणामध्ये अकोल्यात होणार बौद्धांची स्वतंत्र बँक 


महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते यांची अकोल्यात पत्रकार परिषदेत माहिती 


अकोला --देशात विविध धर्माच्या समुद्रायाप्रमाणे आता बौद्ध समुदाय स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी कार्यरत झाला असून बौद्ध समाजाचे स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी बौध्द समाज जागृती करतांनाच त्यांना आर्थिक,सामाजिक आणि राजकीय स्थैर्य देण्यासाठी राजरत्न आंबेडकर प्रणित बौद्ध महासभेचे कार्य प्रारंभ झाले असून बौद्धांची स्वतंत्र सहकारी बँक ठाणे येथे कार्यरत झाली असून अकोल्यात या बँकेची शाखा कार्यांवीत होत असून आज पासून बँकेच्या शेअर्स खरेदीला सुरुवात झाली असल्याची माहिती राजरत्न आंबेडकर प्रणित बौद्ध महासभेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंते यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली 


1955 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौध्द महासभा ही मातृसंस्था चे राजरत्न आंबेडकर प्रणित बौद्ध महासभेच्या कार्याला 3 सप्टेंबर 2022 पासून प्रारंभ झाला असून त्याची कार्यकारिणीचीघोषणा करण्यात आली आहे या संस्थेच्या उद्देशानुसार राज्यात बौध्द समाजाला आर्थिक,राजकीय, सामाजिक,शैक्षणिक ,आरोग्य स्थैर्य देण्याची जबाबदारी बौद्ध महासभेची आहे त्यानुसार काम सुरू झाले आहे ज्याप्रमाणे शीख,जैन,हिंदू ,मुस्लिम समाजातील स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले त्याप्रमाणे बौद्ध समाज अस्तित्व निर्माण करायचे आहे त्यासाठी राज्यातील बौध्द समाजाची स्वतंत्र जनगणना करणे,त्यातही समाजाची होत असलेली दिशाभूल दूर करून सविस्तर आणि खरी माहितीची नोंद करण्यासाठी जागृती केली जात आहे अश्या विविध प्रकारचे उपक्रम राबवून बौद्ध समाजाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले जाते आहे अशी माहिती हनुमंते यांनी आज अकोल्यात दिली यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष डॉ अरुण चक्रणारायन,कार्याध्यक्ष देवीलाल तायडे,बी गोपणारायन,मुक्तराम घुगे,अवचार,यशवंत इंगोले,सदांशीव,सिरसाट,घेवंडे, आनंद पळसपगार , महिला जिल्हा प्रमुख राजकन्या सावळे , बाळासाहेब अंभोरे , दयाशील तायडे , राजू मोरे , नंदरत्न खंडारे , नागेश तेलगोटे , संतोष इंगळे , नागोराव शेजव ' बाळासाहेब ढोके ' राजेश समदुरे , संजय इंगळे , सुनिल सिरसाट ' मंदाताई वानखडे , सुमन सिरसाट उतमराव संदाशिव ' अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र छापाने , वाशिम जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड ' बुलडाणा जिल्हाध्यक्ष रामदास घेंवदे ,विजय नरवाडे, आर आर वानखडे इरभान तायडे,रवी सिरसाट, डी एस तायडे, आर के जामणिक, सागर हातोले, प्रसन्न जित रोकडे, हिम्मतराव सदांशीव,एम ए बोदडे, चंद्र मणी इंगळे, गणेश मेश्राम,मिलिंद घुगे सह अनेकांची उपस्थिती होती


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या