मातंग समाजाचा वधू-वर यां परिचय मेळावा उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला: समस्त मातंग समाज व वेदांतिका कला, क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी जि. प. कर्मचारी कल्याण भवन वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला.
मेळाव्यामध्ये मातंग समाजातील उपवर मुलामुलींनी परिचय दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे न्यायाधीश सुधीर वानखडे यांनी केले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस - वोरा, उपअधीक्षक मनोहरराव सोनोने होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जे. जे. मानकर, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, ईश्वरदास गायकवाड, डॉ. रमेश चंदनशिव, नितीन साठे, चंद्रभान पोळकर, साहेबराव खडसे, आयोजक महादेवराव सदांशिव आदी उपस्थित होते. मातंग समाजातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी १ वाजता उपवर मुलामुलींनी विचारपीठावर येऊन परिचय दिला.
संमेलनामध्ये अकोला जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या १५० च्यावर मुलामुलींनी परिचय दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे योगेश सोनोने, गजानन खंडारे, प्रभाकर लांडगे, प्रकाश तायडे, श्रावण वाघमारे, अॅड. राजेश प्रधान, रामाभाऊ तायडे, मोहन अंजनकर, अॅड. चंद्रकांत बोदडे, प्रमोद शिंदे, श्रावण इंगळे, विजय वानखडे, संतोष कांबळे, भास्कर अंभोरे, नंदलाल सावळे आदींनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या